आमची यशोगाथा
गावाविषयी माहिती
1. कोगदा हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील. किरमिरा, सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २५१५ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ४, अंगणवाडी केंद्रे ५ व व्यायामशाळा २, सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये तसेच, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
2. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, नगली, तूर,उडीद,खुरसणी प्रमुख पिके घेतली जातात. झेंडू हळद या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
3. कोगदा ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सोनगाव गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये सोनगावला विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत सन २०१३-२०१४ पारितोषिक प्राप्त गाव बक्षीस रुपये-२ लक्ष रुपये प्राप्त झाला असून स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा व तालुका पातळीवर मिळाला आहे.
4. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ११ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
5. कोगदा गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
2. भौगोलिक स्थान
कोगदा हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ०९ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ 399.93.70 हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये 3 वार्ड आहेत. एकूण ८६७ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २५१५ आहे. त्यामध्ये पुरुष व महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन छोट्या प्रमाणात आहे. हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी २३०० मीमी पर्जन्यवृष्टी होते.
3. लोकजीवन
कोगदा गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात,नागली,वरी, तुर,उडीद,खुरसणी,कुळीद व हंगामी आंबा, काजु पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक पोलोट्री शेड कुकुट पालन , दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. मखर,माउली,साथी असे आदिवासी सन साथी देव ,डोगऱ्या देव , तसेच स्थानिक निसर्ग देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
कोगदा च्या येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य ३२ गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
कोगदा च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
अ क्र
नाव
पद
1.
सौ.माथुरा राजेश भसरा
सरपंच
2.
श्री. अशोक नामदेव राऊत
उपसरपंच
3.
श्री.हरिचंद्र गणपत चौधरी
सदस्य
4.
सौ.आशा रविंद्र राउत
सदस्य
5.
सौ.अंजली अनिकेत खिरारी
सदस्य
6.
श्री.हरेश वसंत हिरकुडा
सदस्य
7.
श्री. निलेश मन्शुराम भसरा
सदस्य
8.
सौ. निता वसंत वळवी
सदस्य
9.
सौ. बकुळा गौरव घेगड
सदस्य
10.
श्री. वंदना राजेश घेगड
सदस्य